आनंदाची उधळण करीत दिवाळी ही आली.
YouTube
Linkdin
fb Page
तप्त उन्हाच्या झळा सोसत धरती पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहते आणि ढगांतून आलेल्या अमृत सरींनी तृप्त होऊन हिरवीगार होऊन जाते. ती हिरवी शालू नेसून नटून बसते .... केसांत रंगीबेरंगी फुलांचे ताटवे जणू गजरेचं भासतात तिचे..! ही नवी नवरी हिवाळ्यातील गुलाबी थंडीत लाजून चूर झाल्यासारखीच भासते सकाळचं धुरकट वातावरण म्हणजे तिने चेहऱ्यावर घेतलेला घुंगटच असतो जणू अन् जसं जसं उन्हाचे किरण वर येतात तशी ही नवी नवरी हळू हळू सर्वांमध्ये मिसळते आणि सगळ्यांना आपलंसं करते...
तसं पाहिलं गेलं तर हिवाळ्याच्या दिवसांची
लज्जतच भारी... निसर्गाचा नजराणा अन् त्यात सणांचा बहर....सणांचा राजा दिवाळी.... आनंदाचा सण..
पाच दिवसांची ही दिवाळी सुख ,शांती, समृद्धी, आरोग्य देणारी असते. वसुबारस,धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी,लक्ष्मीपुजन,पाडवा आणि भाऊबीज.. यातील प्रत्येक दिवस वेगळी प्रसन्नता देऊन जातो. यातील प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे...
दिवाळी म्हणजे उत्साह... आणि तो बाजारपेठांपासून दिसायला सुरूवात होते. दुकानं गर्दीनं अगदी फुलून गेलेली असतात.विकणारे आणि विकत घेणारे दोघंही आनंदात... तसं पाहिलं तर ते आनंदाचीच तर देवाणघेवाण करत असतात....
सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली.... आनंदाची उधळण करीत दिवाळी आली ....!!!
CSD FOUNDATION परिवरातर्फे सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ....!!!!
©csdfoundation
Contact Us...For New Opportunities In Education Field.
CHILDREN SKILLS DEVELOPMENT FOUNDATION www.csdfoundation.co.in |
Comments
Post a Comment